ग्रामपंचायत आळसंद

ऐतिहासिक स्थळे

Satyamev Jayate

श्रीनाथ मंदिर

आळसंद गावाच्या स्थापनेपासन गावच्या मधोमध चावडीपासन महादेवाच्या मंदिरापासून पूर्वेला गावाचे आराध्यदैवत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे मंदिर आहे. बहूताली सगळी पांढर आनी मधोमध टेकावर मंदिर अशी श्री काळभैरवनाथाची रचना आहे. श्री काळभैरवनाथाचे भव्य मंदिर नंदी,पिंड, नाथाची मूर्ती, स्वयंभू देवस्थान अशी देवाची ख्याती आहे.

नाथ अष्टमीला देवाचा उत्सव असतो. गावाकारी मोठ्या आनंदाने आनी उत्साहाने उत्सव साजरा करतात. कुसबा हे अष्टमीचे खास वैशिष्ट्ये.श्री काळू भैरवनाथाचा प्रसाद म्हणजे कुसुंबा. सुंठ, वेलदोडे, सुपारी, बडीशेफ, काजू, बदाम, साखर पाणी, नारळ पाणी मान म्हणून इतर पदार्थ असे सगळे मिश्रन करुण चवदार गोड कुसुंबा मोठ्या भांड्यात तयार केला जातो व नतर प्रसाद म्हनुण न वाटला जातो तो चमचाभर जरी पोटात गेला तरी पोटातील सगळी व्याधी विकार वाईट शक्ती काढून टाकतो अशी लोकांची धारणा आहे.

श्रीनाथ मंदिर

परमपूज्य श्री लिंगेश्वर महाराज मठ

परमपूज्य श्री लिंगेश्वर महाराज मठाची स्थापना साधारणता सन १९७५ साली झाली. पूर्ण गावाचं आणि पंचकृषीतील भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे लिंगेश्वर महाराज मठ महाराज स्वतः तिथे वास्तव्याला होते, गोरापान उंची पुरा असलेला रुबाबदार मध्यम बांधा, देखण तेजोपुंज रूप, प्रसन्न चेहरा, पांढरे केस, पांढरी शुभ्र मोत्या सारखी लांब दाडी, शांत मुद्रा, ओठावर कायम स्मिथ हास्य अस महाराजांचे रूप होते. मठामध्ये कायम प्रसन्नता असते. तसेच श्री स्वामी समर्थ, श्री राम जय राम राजाराम अशी धून कायम कानावर पडते.

मठात मुख्य गाभाऱ्याबरोबरच नामस्मरण करायला सोफा, डाव्या बाजूला महाराजांची निवासाची खोली अशी रचना आहे. जवळच मठाच्या डाव्या बाजूला विहीर आहे त्याचे पाणी गोड, थंड व चवदार आहे. मठामध्ये वसंत पंचमी, श्री दत्त जयंती, महाराजांची जयंती व पुण्यतिथी व महिन्यातील पोर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो.

परमपूज्य श्री लिंगेश्वर महाराज मठः

काशी विश्वेश्वर महादेव मंदिर

येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे. सुमारे ३५० वर्षाचे ते जुने आहे. येथील दगडी खांब नक्षीदार आहेत. या ठिकाणी शिव-पार्वती असे पंचमुखी शिवालय आहे. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, गणपतीचे मंदिर, मायक्का मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर अशी जुन्या काळातील मंदिरे अस्तित्वात आहेत. काही मंदिरे ही २० ते २५ वर्षांमध्ये ग्रामस्थांनी स्वतः ही बांधली आहेत. आळसंदमध्ये या सर्व मंदिरांत मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. कदाचित देशभरातही अशा प्रकारची फार कमी गावे असतील

काशी विश्वेश्वर महादेव मंदिर काशी विश्वेश्वर महादेव मंदिर

गावातील मंदिरे..

अकरा मारुती मंदिर

हे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे येथील लोक सांगतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिळेवर ११ मारुती, बारावा गणपती व तेरावी सरस्वती आदी देवांची मुर्ती कोरलेली आढळते. असे मंदिर महाराष्ट्रात दुर्मिळ असल्याचेही सांगितले जाते. गावातील हिंदू- मुस्लिम बांधव या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

ग्रामदैवत नाथबाबा

आळसंदचे ग्रामदैवत असलेल्या नाथबाबा मंदिराची स्थापना सोळाव्या शतकात करण्यात आल्याचे येथील लोक सांगतात. सिध्दनाथांची मुर्ती असलेल्या या मंदिरात शंकराची पिंड व समोरील बाजूस नंदी व कासव यांच्या मुर्ती आहेत. हे हेमांडपंथी प्रकारातील मंदिर असून या ठिकाणचे स्तंभ व दगडावरती कोरीव काम केलेले आढळते. आळसंदमधील जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे

ज्ञानेश्वर माऊली मंदिर

हे मंदिर २५ वर्षापुर्वी गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्थापन केले आहे. या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत ज्ञानेश्वर यांच्या मुर्ती असून दरवर्षी या ठिकाणी साप्ताहिक पारायण सोहळ्याचे अयोजन केले जाते.

श्री अष्टविनायक गणेश मंदिर

या मंदिराची स्थापना सात वर्षापुर्वी गावातील दानशूर व्यक्तीमत्व गणपती जाधव (शाहीर) यांनी स्वखर्चातून केली आहे. या मंदिरात गणपती व नंदी यांच्या मुर्ती आहे. आळसंद गावची शोभा वाढवणारे हे मंदिर आहे.

लिंगेश्वर महाराज मठ

लिंगेश्वर महाराज हे लिंगदरी (सागरेश्वर अभयारण्य) येथून १९६० मध्ये आळसंद येथे आले होते. त्यावेळी गावातील श्रीपती कुलकर्णी यांनी त्यांच्या मळ्यामध्ये महारांजांना पुजा-अर्चा करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. या ठिकाणी गावातील बबन कुंभार (महाराज) वयाच्या १३ व्या वर्षीपासून सेवेत होते. २० मार्च १९९२ साली लिंगेश्वर महाराज यांनी समाधी घेतली. दरवर्षी लिंगेश्वर महाराज मठामध्ये वसंत पंचमी अक्कलकोट स्वामी पुण्यतिथी, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, लिंगेश्वर महाराज पुण्यतिथी, बबन महाराज पुण्यतिथी, पारायण सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसदाचे आयोजन केले जाते.

शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा

दगडी चबुतऱ्यावरती बसविण्यात आला आहे. पाठीमागील बाजूस भव्य कमान असलेले गावचे प्रवेशद्वार व दोन्ही बाजूस बुरुज यांचे कोरीव दगडांत बांधलेले आहेत. हा सर्व खर्च ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केलेला आहे. या गावामध्ये गेल्या तीस वर्षापासून शिवजंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त शोभेच्या दारुची भव्य आतिषबाजी, लेझीम व पारंपारिक वाद्यासह मिरवणूक काढण्यात येते.

राजवल्ली पिर व दस्तगीर पिर

राजवल्ली पिर व दस्तगीर पिर हे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय नैवेद्य अर्पण करतात.

ओढ्यातील महादेव मंदिर

हे मंदिर ३००-३५० वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात असून गावच्या ओढ्यामध्ये हे मंदिर उभा करण्यात आले आहे. या ठिकाणी शंकराची पिंड पहावयास मिळते.